Breaking
बालिका वधू फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन


मुंबई : बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने ४० व्या वर्षी सिद्धार्थची प्राणज्योत मालवली. मुंबईतील कूपर रुग्णालयाने त्याला मृत घोषित केलं आहे.


सिद्धार्थ शुक्लाने झोपण्याच्या काही तासापूर्वी औषधे घेतली होती, मात्र त्यानंतर तो उठू शकला नाही. सिद्धार्थ शुक्लाचा शवविच्छेदन अहवाल प्रतीक्षेत असून, त्याच्यासोबत राहणाऱ्या लोकांचे स्टेटमेंट घेण्यात येणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.


बिग बॉस जिंकल्यानंतर सिद्धार्थ खूप सक्रिय झाला. टीव्ही शोमध्ये त्याला अनेकदा पाहुणा म्हणून बोलावले जात असे. अलीकडेच सिद्धार्थ बिग बॉस ओटीटी आणि डान्स रिअॅलिटी शो डान्स दिवाने मध्येही दिसला होता. तसेच, वरूण धवन आणि आलिया भट्टच्या हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटातही दिसला होता. 'बालिका वधू' या दूरचित्रवाणी मालिकेत त्याने शिवाची भूमिका साकारली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा