Breakingजिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पंचायत समिती जुन्नर येथे रक्तदान शिबीर संपन्न


जुन्नर : आज जुन्नर पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ सभाग्रह येथे रक्तदान शिबीराचे आयोजित करण्यात आले होते. जुन्नर नगर परिषद, महसूल विभाग, पंचायत समिती, पोलीस प्रशासन, सार्वजनिक आरोग्य विभाग अशा शासकीय विभागांनी यात सहभाग घेतला होता. त्यावेळी रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला प्रमाणपत्र देण्यात आले.


गेल्या दीड वर्षापासून देश करोनाच्या महामारीतून जात असताना अनेक ठिकाणी रक्ताचा तुटवडा जाणवत होता. महाराष्ट्रात देखील रक्ताचा मोठा तुटवडा असल्याचे समोर आले होते. 


पुणे जिल्हयामध्ये डेंग्यू, चिकुनगुनिया इत्यादी साथ रोगजन्य आजारांचे रुग्ण जिल्हयाच्या विविध भागांमध्ये आढळून येत आहेत. या आजारांमध्ये शरीरामधील पांढऱ्या पेशींची (प्लेटलेट्स) संख्या कमी होते, आणि सद्यस्थितीत सुरु असलेल्या कोविड साथीमुळे शाळा, कॉलेज, खाजगी कार्यालये, सामाजिक संस्था यांचेमार्फत घेण्यात येणारी रक्तदान शिबीरे बंद झाल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्याने आज पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये आज एकाच दिवशी खाजगी रक्तपेढ्यांच्या समन्वयातून रक्तदान शिबीर आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले होते. 


रक्तदान शिबीरावेळी नायब तहसीलदार सचिन मुंढे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, मुख्याधिकारी जुन्नर नगरपरिषद मच्छिन्द्र घोलप, तालुका आरोग्य अधिकारी गोडे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक, आरोग्य निरीक्षक प्रशांत खत्री, सिटी कोऑरडीनेटर स्वप्निल जावळे हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा