Breakingब्रेंकिंग : आरोग्य विभागाच्या परीक्षेची नवी तारीख जाहीर, या दिवशी होणार परीक्षा


मुंबई : दोन दिवसांपूर्वी आरोग्य विभागाच्या गट-क आणि गट-ड संवर्गातील विविध पदांसाठी २५ आणि २६ सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा आदल्या दिवशी पुढे ढकलली होती, या निर्णयामुळे विद्यार्थी संतप्त झाले होते. आज पुन्हा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली आहे.


आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गट - क ची परीक्षा २४ ऑक्टोबरला तर गट - ड ची परीक्षा ३१ ऑक्टोबरला अशी नवीन तारीख जाहीर केली आहे. तसेच परीक्षेच्या नऊ दिवस अगोदर विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळेल असेही टोपे म्हणाले. 


आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड संवर्गातील एकूण ६,२०५ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा