Breakingब्रेकिंग : आरोग्य विभागाच्या गट-क आणि गट-ड संवर्गातील परीक्षा रद्द


मुंबई : आरोग्य विभागाच्या गट-क आणि गट-ड संवर्गातील विविध पदांसाठी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.


आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड संवर्गातील एकूण ६,२०५ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार होती, मात्र अचानक ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ही परीक्षा उद्या २५ सप्टेंबर आणि २६ सप्टेंबर रोजी होणार होती. त्यासाठी विद्यार्थी देखील परीक्षा केंद्रावर पोहोचले आहेत. त्यामुळे विद्यार्थी संताप व्यक्त करत आहेत.


दरम्यान, आज सकाळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या गट - क गट - ड संवर्गातील भरती प्रक्रिया सुरू असून परीक्षार्थींनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले होते. मात्र, आता पुन्हा ही परीक्षा पुढे ढकलली आहे. 

1 टिप्पणी:

  1. He khup cukich Ahe ऐन वेळेस हे सगातात की परीक्षा रद्द आम्ही विद्यार्थ्यांनी काय करायचं प्रत्येक जण परीक्षेसाठी मोठी तयारी करून बसलेले असतात आणि त्यात अशा न्यूज ऐकून मानसिक त्रास होतो एकतर भरतीच नव्हती kadahychi पहिली नीट नियोजन यांना येत नसेल तर

    उत्तर द्याहटवा