Breakingब्रेकींग : राज्यातल्या शाळा सुरू होणार, मुख्यमंत्र्यांची प्रस्तावास मान्यता


मुंबई : राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे मार्च महिन्यात बंद झालेल्या राज्यातल्या शाळा येत्या चार ऑक्टोबरपासून पुन्हा सुरु होत आहेत.


शिक्षण विभागाने राज्यातल्या शाळा सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला होता. गेले काही महिने राज्यातल्या शाळा सुरु करण्याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरु होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरु करायला परवानगी दिली नव्हती. राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे तज्ञांचे म्हणणे होते, त्यामुळे पुन्हा एकदा शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव लांबणीवर पडला होता.

मात्र, आता मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव मान्य केला आहे. त्यानुसार कोरोनाचे सर्व नियम पाळून राज्यातल्या शाळा पुन्हा सुरु केल्या जाणार आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा