Breakingब्रेकिंग : पर्म विद्यापीठात दहशतवादी हल्ला, ८ जणांचा मृत्यू तर ६ जखमी


रशियातील पर्म विद्यापीठात दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळी स्थानिक वेळेनुसार ११ च्या सुमारास विद्यापीठामध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  


अज्ञातांनी विद्यापीठात अचानक गोळीबार केल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी खिडक्या आणि छतावरून उड्या मारल्या. या हल्ल्यात ८ जणांचा मृत्यू झाला आहे असून ६ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. यात जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


पर्म हे रशियातील प्रसिद्ध विद्यापीठ आहे. या विद्यापीठात देश-विदेशातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. मात्र आज अचानक गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.


स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार हल्लेखोर याच विद्यापीठातील विद्यार्थी असून त्याला ताब्यात घेतलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा