Breaking


कार कंपनी फोर्ड भारतातील व्यवसाय गुंडाळणार, हजारो कामगार बेकार होणार


मुंबई : अमेरिकेची दिग्गज कार निर्माता कंपनी 'फोर्ड'नं एक मोठा निर्णय घेतल्याचं समजतं. फोर्ड कंपनीनं भारतातून आपलं बस्तान गुंडाळलं आहे. त्यामुळे आता फोर्ड कंपनीची कार खरेदी करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. भारतीय ग्राहकांना विदेशातून कार मागवावी लागेल. त्यामुळे जादा किंमत मोजावी लागेल.


चेन्नई आणि गुजरातमधील आपले कारखाने बंद करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. मात्र, फोर्ड मोटर कंपनीकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यासंदर्भात कंपनीकडून अधिककृत घोषणा लवकरच करण्यात येईल असं सांगण्यात येत आहे.


फोर्डनं भारतातील मॅन्युफॅक्चरिंग यूनिट्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या फोर्ड कंपनीला 'इको स्पोर्ट्स' (Ecosports) लाँच झाल्यावर भारतीय बाजारपेठेत चालना मिळाली. मात्र, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे कंपनीची परिस्थिती अधिकच बिकट झाली. वाहनांच्या विक्रीतही मोठी घट झाली आहे. 

कोरोना काळात कंपनीला सुमारे 2 अब्ज डॉलर्सचा फटका बसला. याच कारणामुळे फोर्ड मोटरनं आता चेन्नई आणि गुजरातमधील आपले कारखाने बंद करण्याचा निर्णय घेतला. कंपनी या प्लांट्सपासून बनवलेल्या इकोस्पोर्ट, फिगो आणि एस्पायर सारख्या वाहनांची विक्री देखील बंद करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.


फोर्डच्या आधी, जनरल मोटर्स आणि हार्ले-डेव्हिडसन सारख्या दिग्गज अमेरिकन ऑटोमोबाईल कंपन्यांनीही भारतातून आपला व्यवसाय गुंडाळला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा