Breaking

सावरगाव येथे आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी


सावरगाव, दि.७ (रफिक शेख): सावरगाव (ता.पारनेर) येथे जयमल्हार संघटनेचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिरतर आयोजित आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली.


यावेळी गावातील डॉक्टर, पोलीस अधिकारी ग्रा.पं.पदाधिकारी, कोरोना योद्धाना यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच लोकभारती जुन्नर तालुका अध्यक्ष खालिद पटेल यांना आदर्श समाजसेवक सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.


त्यावेळी सावरगावचे पोलीस निरीक्षक बळप, मुस्तफा सय्यद, किरण उपाळकर, लोकभारतीच्या महिला अध्यक्ष छाया उपाळकर, वंचित बहुजन आघाडीचे जावेद मोमीन, राजे ग्रुपचे अध्यक्ष जुंबर शेख उपस्थित होते.


दरम्यान, परिसरातील गोरगरीब जनतेस व लहान मुलामुलींना कपडे, वृद्ध लोकांना काठ्या, महिलांना राशन व इतर गरजेच्या वस्तू मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा