Breaking


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस, काय बोलले पहा !


ठाणे, दि.३ : फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करताना ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला झाला होता. त्यामध्ये त्यांच्या हाताची  दोन बोटे तुटली. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.


यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, तुमच्या बहादुरीचे वर्णन कोणत्या शब्दात करावे…ताई तुम्ही काळजी नका तुमच्यावर हल्ला करणाऱ्याला कठोर शासन केले जाईल. तुम्ही चिंता करू नका फक्त लवकरात लवकर बरे व्हा. राज्य शासन आपल्या पाठीशी आहे, असा दिलासा देतानाच तुमच्या प्रकृतीची मी रोज माहिती घेत असतो. काळजी करू नका ठणठणीत बरे व्हा, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी पिंपळे यांची विचारपूस केली.


आज मुख्यमंत्र्यांनी महापौरांच्या मोबाईलवरून पिंपळे यांच्याशी संवाद साधला. यावेळी महापालिका आयुक्त विपीन शर्मा उपस्थित होते. कल्पिता पिंपळे यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा