Breaking


शिहरीपाडा रस्त्याची समस्या त्वरित सोडवावी नागरिकांची झिरवाळ यांच्याकडे मागणी


पेठ : पेठ तालुक्यातील शिहरीपाडा या गावातील रस्त्याची चाळण झाली असताना नुकत्याच झालेल्या पावसामुळे या रस्त्याची आणखी बिकट अवस्था झाली आहे. त्यामुळे या गावातील रस्त्याची समस्या त्वरित सोडवावी अशी मागणी शिहरीपाडा नागरिकांनी केली आहे.


दरम्यान, दिंडोरी तालुक्यातील भनवड याठिकाणी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी शिहरीपाडा गावातील नागरिक मोतीराम भोये, प्रकाश भोये, हरीभाऊ कामडी आदी उपस्थित राहून गावातील रस्त्याबरोबरच इतर समस्या मांडल्या तसेच निवेदन दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा