Breaking


"त्या" पोस्टमुळे अभिनेत्री केतकी चितळेच्या अटकेची शक्यता, अटक पूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला


मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. तिच्या सोशल मीडिया पोस्टही अनेकवेळा विवादीत ठरतात. तिला अनेकदा ट्रोल ही करण्यात आले आहे. यावेळी अभिनेत्री केतकी चितळेवर गुन्हा (FIR) नोंदवण्यात आल्याने केतकी पुन्हा चर्चेत आली आहे. 


अभिनेत्री केतकीने 1 मार्च 2020 रोजी सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या वादग्रस्त पोस्टमुळे 3 मार्च 2020 रोजी वकील स्वप्नील जगताप यांनी नवी मुंबई येथील रबाळे पोलीस ठाण्यात केतकी चितळे व सुरज शिंदे विरुद्ध जाती व जमाती अत्याचार प्रतिबंद कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. यासंदर्भात आता ठाणे कोर्टाने तिचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे केतकीच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे केतकीला अटक होण्याची शक्यता निर्माण झालीय.


काय होती पोस्ट


लोकसत्ताच्या हवाल्यानुसार “नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू,असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो,” असं तिनं आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं होतं. त्यानंतर तिच्या या पोस्टवर काही जणांनी आक्षेप घेतला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा