Breakingदिल्ली दंगल हा पूर्वनियोजित कट - दिल्ली उच्च न्यायालय


नवी दिल्ली : राजधानीत कोणत्याही घटनेनंतर अचानक हिंसाचार उफाळून आला नाही, सर्व काही पूर्वनियोजित होते, अशी टिप्पणी दिल्ली उच्च न्यायालयाने केली आहे.


सीएए कायद्यावरुन राजधानी दिल्लीत गेल्या वर्षी जोरदार हिंसाचार उफाळून आला होता. यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू तर कित्येक लोक जण गंभीर जखमी झाले होते. दिल्ली दंगल हा पूर्वनियोजित कट होता. कारण राष्ट्रीय राजधानीत कोणत्याही घटनेनंतर अचानक हिंसा अचानक उफाळून आली नाही असे दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले आहे. या प्रकरणातील एका आरोपीला जामीन नाकारताना न्यायालयाने ही टीप्पणी केली.


कोर्टाने पुढे म्हटले की, न्यायालयात सादर केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये आंदोलकांचे आचरण स्पष्ट दिसत आहे. सरकार तसेच शहरातील लोकांचे सामान्य जीवन विस्कळीत करण्यासाठी ही दंगल सुनियोजित पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना नष्ट करणे हे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याच्या आधीच नियोजित षडयंत्राची पुष्टी करते असेही न्यायालयाने म्हटले आहे


या महिन्यात दिल्ली कोर्टाने दिल्ली दंगलीसाठी पोलिसांना फटकारले होते. फाळणीनंतरच्या सर्वात भीषण दंगलीचा तपास दिल्ली पोलिसांनी केला होता, तो दु: खद असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. ही तपासणी असंवेदनशील आणि निष्क्रिय असल्याचे सिद्ध झाले आहे असेही न्यायालयाने सुनावणीदम्यान म्हटले होते.


कोर्टाने पुढे म्हटले की, न्यायालयात सादर केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये आंदोलकांचे आचरण स्पष्ट दिसत आहे. सरकार तसेच शहरातील लोकांचे सामान्य जीवन विस्कळीत करण्यासाठी ही दंगल सुनियोजित पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना नष्ट करणे हे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याच्या आधीच नियोजित षडयंत्राची पुष्टी करते, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा