Breakingआदिवासी विकास विभागात शिक्षक भरतीची मागणी


सुरगाणा ता.19 (दौलत चौधरी) : आदिवासी विकास विभागात गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे शासकीय आश्रम शाळेमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे हि पद भरती तात्काळ करण्यात यावी अशी मागणी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण धारकांनी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


भावी शिक्षक शासनाच्या नियमानुसार शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. परंतु आज अनेक भावी शिक्षक बेरोजगारीच्या समस्येला तोंड देत आहेत. दुसरी शिक्षक अभियोगीता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी केली आहे. यावेळी झिरवाळ यांनी, शिक्षक पद भरती करण्यासाठी शासन दरबारी दिलेल्या शिक्षक भरती संदर्भात त्वरीत दखल घेतली जाईल असे आश्वासन दिले.


निवेदन देते वेळी मनोहर गुंबाडे, दौलत जाधव, अर्जुन भोये, अनिल भुसारे, हरिष अलबाड, पुंडलिक टोपले, चंद्रशेखर धुम. रमेश जोपळे, हेमंत चौधरी, रंजना गावित, परशुराम बिरारी, सह आदी पात्र धारक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा