Breaking


15 टक्के फी कपात आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या शिक्षण संस्थांवर कारवाई करण्याची मागणी


कोल्हापूर शालेय शैक्षणिक फीमध्ये 15 टक्के कपात करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या शिक्षण संस्थांवर कारवाई करा, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा नागरीकृती समितीच्या वतीने सहाय्यक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांच्याकडे करण्यात आली.


हे वाचा ! विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती त्वरित वितरित करण्याचे आदेश


निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने शालेय शैक्षणिक फी मध्ये १५% कपातीचे आदेश काढले आहेत. पण त्याची प्रत्यक्षात कोणत्याही शाळा अमंलबजावणी करताना दिसत नाही. त्यामुळे सामान्य पालकांची आर्थिक कुचबंणा होत आहे. 


निवेदन देतेवेळी अशोक पवार, रमेश मोरे, भाऊ घोडके, चंद्रकांत सूर्यवंशी, अनिल पाटील, राजू मालेकर, विलास भोंगाळे, रमाकांत अँग्रे, विनोद डूणंग, राजेश वरक उपस्थित होते.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा