Breakingऊसतोडणी व वाहतूक कामगारांची कल्याणकारी मंडळात नोंदणी सुरू करण्याची मागणी


बीड : ऊसतोडणी व वाहतूक मुकादम कामगारांची गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळाकडे नोंदणी सुरु करावी, अशी मागणी सिटू संलग्न महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्या वतीने बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.


कल्याणकारी महामंडळाचे ओळखपत्र व सेवापुस्तिका त्वरित द्या, प्रदीर्घकाळ उपेक्षित राहिलेल्या कामगारांना महामंडळाचे लाभ / सुविधा लागू करा, गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊसतोडणी व वाहतूक मुकादम कामगारांची कल्याणकारी महामंडळाकडे नोंदणी सुरु करावी, नोंदीत उसतोडणी व वाहतूक कामगार मुकादम यांना महामंडळाचे ओळखपत्र आणि सेवापुस्तिका द्या, ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळाच्या कामकाजासाठी प्रतिनिधी समिती करा आणि त्यावर महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे दोन प्रतिनिधी घ्यावेत, बीड जिल्ह्यातील ऊसतोडणी मजूर महीलांपैकी गर्भाशयाचे ऑपरेशन झालेल्या महिलांना अपंग प्रमाणपत्र देऊन पेन्शन सुरु करा, बीड जिल्हयातील ऊसतोडणी कामगारांसदर्भात निलम गोरे समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करा, आदी मागण्या करण्यात आल्या. 

निवेदन देतेवेळी सिटू संलग्न महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता डाके, जिल्हा सचिव सय्यद रज्जाक, सुदाम शिंदे, मोहन जाधव, विशाल गोरे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा