Breakingदिघी : मॅविक सायकल क्लब ला 'पर्यावरण संवर्धन सायकलपटू गौरव सन्मान' प्रदान


दिघी : अमर मित्र मंडळ आयोजित पर्यावरण पूरक गणेश उत्सवानिमित्त निसर्ग संवर्धन व स्वच्छता संदेश देत सायकल रॅलीच्या माध्यमातून विविध शहरी भागात व धार्मिक स्थळी "झाडे लावा, झाडे जगवा, पाणी आडवा, पाणी जिरवा", "सायकल चालवा, इंधन वाचवा", आदी पर्यावरण संवर्धन जनजागृतीसाठी मोलाचे कार्य केल्याबद्दल मॅविक सायकल क्लब ला 'पर्यावरण संवर्धन सायकल पटू गौरव सन्मान' प्रदान करण्यात आला.


यावेळी सायकल पटू दत्ता घुले, मयूर पिंगळे, अतुल चव्हान, झुनेद मुलाणी, कुलदिप कोकाटे, प्रतिक जाले, नचिकेत बाकारे, सौरव खोत, ओमकार इंगळे, निखिल बांबळे यांना सन्मानित करण्यात आले.

या वेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर हिरा घुले, माजी नगरसेवक दत्तात्रय गायकवाड, अमर मित्र मंडळ अध्यक्ष उदय गायकवाड, नवजीवन शिक्षण मंडळाचे विनायक वाळके, शिवाई नागरी पथसंस्था चेअरमन संजय गायकवाड, माजी सैनिक अध्यक्ष अशोक काशिद, जयराम वाळके, शांताराम वाळके, रमेश विरनक, प्रमोद पठारे, विकि आकुलवार, प्रल्हाद जगताप आदी मान्यंवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमित माडीक यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा