Breaking

दिघी : निकीता कोंचिंग क्लासेस मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा !


दिघी : विद्यार्थांच्या आयुष्या मध्ये संस्काराची योग्य दिशा व उज्वल भविष्य घडवण्यासाठी शिक्षकांची मोठी भुमिका असते. दिघीतील नामांकित निकिता कोंचिंग क्लासेस मधील विद्यार्थांनी शिक्षकदिना निमित्त वकृत्व भाषणातून शिक्षकांचे महत्व सांगितले. तसेच मुला मुलींनी नृत्य सादरीकरण करुन दाखवले.


यावेळी गरिब व होतकरु मुलानां पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख सायकलपटू दत्ता घुले व के. के. जगताप होते.


सायकलपटू दत्ता घुले यांनी मुलांना नियमित अभ्यासा बरोबरच व्यायामही नियमित केला पाहिजे. मुलांनी मोबाईल गेम मध्ये चॅम्पियन न होता, मैदानी खेळामध्ये उत्कृष्ट खेळाडू झाले पाहिजे. तुम्हाला ज्या खेळात आवड आहे त्या खेळासाठी वेळ दिलाच पाहिजे आदीचे विद्यार्थानां मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निकिता सुरवडे यांनी केेले तर आभार चंदा सुरवडे यांनी मानले.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा