Breaking

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आयोजित डिजिटल साक्षरता जागृती मेळावा संपन्न


वडवणी : द बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आता हळूहळू पूर्वपदावर येत असुन बँकिंग क्षेत्रामध्ये टिकून राहण्यासाठी सुरुवात म्हणून बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी यांच्या मार्फत कर्ज घेतलेल्या कर्जदार शेतकऱ्यांना एटिएमचे वाटप करण्यात आले.


खातेदारांना करोना सारख्या महामारीच्या काळात सोसायटीचे कर्ज रक्कम, अनुदानची रक्कम, पिक विमा रक्कम मिळवण्यासाठी बँकेत गर्दी करण्याची गरज भासणार नाही. त्याच अनुषंगाने ग्रामीण भागातील सभासद शेतकऱ्यांना बँकेच्या विविध सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तंत्रज्ञानाचा वापर करता यावा यासाठी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने ११ सप्टेंबर रोजी मैदा, घाटसावळी, देवळा येथे डिजिटल साक्षरता जागृती मेळावा घेण्यात आला.


जेष्ठ तपासणीस एस पी जाधव, शाखाधिकारी अशोक कदम, गट सचिव सुदाम साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत करोनाच्या सर्व नियमांचे पालन करुन मेळावा घेण्यात आला. यावेळी विविध सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, सरपंच, उपसरपंच, सभासद शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना जेष्ठ तपासणीस एस पी जाधव यांनी सांगितले की, जास्तीत जास्त खातेदारांनी एटिएमचा वापर करावा, यासह आपल्या खात्यात जमा रक्कम किती आहे. शिल्लक किती आहे समुजन घ्यावे, प्रधानमंत्री विमा योजना व जीवन ज्योती विमा योजना बँकेत उपलब्ध आहेत. पाच लक्ष रुपयांपर्यंत ठेवींवर विमा संरक्षण असल्याने जास्तीत जास्त खातेदारांनी बँकेत ठेवी जमा कराव्यात आणि सर्व योजनांचा लाभ खातेदारांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


उतरेश्वर घुमरे घाटसावळी येथील मेळाव्यास प्रमुख उपस्थिती म्हणुन माजी जि प उपाध्यक्ष शिवाजी फड, सरपंच घाटसावळी अरुण लांडे, शिवाजी खोतड, गोरख काळे तसेच देवळा येथील मेळाव्यास चेअरमन रावसाहेब डोंगरे, सरपंच डॉ सुरेश शिंदे, महादेव हुंबे यांसह मेळाव्यात शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा