Breakingई - पिक पाहणी : आदिवासी भागात रेंजसह सर्व सुविधा असणाऱ्या मोबाईलचा अभाव, अधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन नोंदणी करण्याची मागणी


जुन्नर / शिवाजी लोखंडे : आदिवासी भागात रेंजसह सर्व सुविधा असणाऱ्या मोबाईलचा अभाव असल्याने अधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन ई - पीक पाहणीची नोंदणी करण्याची मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने नायब तहसीलदार सचिन मुंडे यांच्याकडे करण्यात आली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, ई - पिक पाहणी शासनाचा हा निर्णय सर्व सामान्य गरीब आदिवासी शेतकन्यांवर अन्यायकारक आहे. कारण सर्वच शेतकऱ्यांकडे सर्व सुविधा असणारे मोबाईल उपलब्ध नाहीत, दुर्गम भाग असल्याने मोबाईल रेंजची समस्या आहे. तसेच अंशत : उपलब्ध मोबाईल धारक आदिवासी योतकरी सदरची ई - पिक पाहणी सारख्या नोंदी बिनचूक करू शकत नाहीत. त्यामध्ये काही शेतकरी हे वयोवृद्ध, अंध, अपंग असल्याने या नोंदी करण्यात ते असमर्थ आहेत. त्यामुळे निर्धारित मुदतीमध्ये ई - पिक पाहणी नोंदी न झाल्याने आदिवासी शेतकऱ्यांची संभाव्य नुकसान होणार आहे.


यासाठी शासनाचे तालुका स्थरावरील जबाबदार सनियंत्रण अधिकारी यांनी कृषी मंडल अधिकारी , कामगार तलाठी व कृषी अधिकारी तसेच कृषी सेवक यांनी गावोगावी जाऊ ई - पीक पाहणी करुन घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदन देतेवेळी हिरडा कारखाना अध्यक्ष काळू शेळकंदे, पंचायत समिती सदस्य काळू गागरे, पोपट रावते, अखिल भारतीय किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी, बुधाजी तळपे, देवराम नांगरे, रोहिदास बोऱ्हाडे, कोंडीभाऊ बांबळे आदीसह उपस्थित होते.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा