Breakingकेंद्रीय कृषी मंत्र्यांसोबत बैठक लावून हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील - खासदार डॉ. प्रीतम मुंडे


किसान सभेच्या वतीने खा. प्रीतम मुंडे यांना विविध मागण्यांचे निवेदन


परळी / अशोक शेरकर२०२० च्या पिक विम्याच्या प्रश्नावर केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट घडवून आणावी व शेतकऱ्यांना पिक विमा मिळावा या मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना निवेदन देण्यात आले.


यावेळी बोलताना खा. मुंडे म्हणाल्या, केंद्रीय कृषी मंत्र्यांसोबत २०२० च्या पिक विम्या सोबत लवकरच बैठक लावून हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे.


शिष्टमंडळात किसान सभेचे पांडुरंग राठोड, परमेश्वर गीत्ते, पप्पु देशमुख, बाळासाहेब कडभाने, विशाल देशमुख, विष्णु देशमुख यांचा समावेश होता.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा