Breaking



जुन्नर : ई - पीक पाहणी अँप वापरण्याबाबत शेतकरी अनभिज्ञ, जनजागृती करुन अडचणी सोडविण्याची किसान सभेची मागणी


जुन्नर / शिवाजी लोखंडे : ई - पीक पाहणी अँप वापरण्याबाबत शेतकरी अनभिज्ञ आहे, त्यासाठी जनजागृती करुन अडचणी सोडविण्याची मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने महसूल विभागाचे नायब तहसीलदार शांताराम किरवे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.


यावेळी किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी म्हणाले, पीक पाहणी प्रक्रिया अँपद्वारे करण्याचा उपक्रम अत्यंत चांगला आहे. परंतु जुन्नर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात अनेक वेळा नेटवर्क मिळत नाही. याचबरोबर बहुतांश शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाहीत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना ही पीक पाहणी शेतात जागेवर जाऊन करणे अडचणीचे होत आहे. तरी शासनाने या नोंदणी अँपची शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करुन व येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपयोजना करावी.


निवेदन देतेवेळी अखिल भारतीय किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी, नवनाथ मोरे, सचिन मोरे, आशिष शेळकंदे उपस्थित होते.



1 टिप्पणी:

  1. .. प्रत्येक गावात 50 मुले तरी Graduate असतील 3-4 मुलांनी मनावर घेतलं तर एक दिवसात सगळ्या गावाची पीक पाहणी होऊन जाईल...

    उत्तर द्याहटवा