Breaking

दिल्लीत तुंबली, महाराष्ट्रात पुढच्या चार दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊसचा इशारा


पुणे / रफिक शेख : देशाची राजधानी नवी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे दिल्लीत पाणी तुंबल्याची घटन समोर आली आहे.


तर, भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील काही तासात बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्यानं मुसळधार पाऊस होऊ शकतो, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे. 

दिल्ली पाण्याने तुंबली !

आज संततधार पावसामुळं दिल्लीच्या विविध भागाता पाणी तुंबल्याचं समोर आलं आहे . प्रामुख्यानं मोती बाग आणि आर के पुरम या भागात पावसाचं पाणी तुंबल्याची छायाचित्र एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रकाशित केली आहेत.

महाराष्ट्रात चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता !

महाराष्ट्रात येत्या चार दिवसात मुसळधार पावसाची शक्यता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन ते वेस्ट - नॉर्थ वेस्ट दिशेने सरकण्याची शक्यता आहे. यामुळे त्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. यामुळे राज्यात येत्या 4, 5 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा