Breakingमिशन फाॅर व्हिजन फाउंडेशन पुणे या संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबीर संपन्न


पुणे (दि.२८) : मिशन फाॅर व्हिजन फाउंडेशन पुणे या संस्थेच्या माध्यमातून चिखली घरकुल येथे महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबीर दि. २८ सप्टेंबर रोजी संपन्न झाले. लोकमान्य होलिस्टिक कॅन्सर केअर & रिसर्च सेंटर चिंचवड, पुणे व प्रयास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


या शिबिरात जनरल तपासणी स्तनांची तपासणी (IBE) गर्भाशय मुखाची तपासणी (HPV) करण्यात आली. या शिबिरात एकुण ६२ महिलांनी सहभाग घेतला होता. शिबीराचे उद्घाटन माधव पाटील शहर अध्यक्ष राष्ट्रवादी पदवीधर संघ पिंपरी चिंचवड, अंबादास बेळसांगविकर उपाध्यक्ष राष्ट्रवादी पदवीधर संघ पिंपरी चिंचवड यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिराला संस्थेचे अध्यक्ष सहदेव गोळे, खजिनदार तानाजी कसबे, प्रयास संस्थेच्या डॉ. तृप्ती धारपवार, सीमा कंद, योगीनी थोरात, कविता शेळके आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा