Breakingमोशी, घरकुल, चिंचवड येथे गणपती दान, निर्माल्य व्यवस्थापनदिव्यांग पोलीस मित्रांचे गणपती संकलनातून मनपाला सहाय्य


घरकुल मध्ये गणपतीदान, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !


पिंपरी चिंचवड : कै. तुकाराम तनपुरे फाउंडेशन, पोलीस आणि नागरिक मित्र संघटना यांच्या वतीने मोशी घाट टोल नाक्यावर जवळ आणि जल वायू विहार सोसायटी सेक्टर नंबर ६, मोशी प्राधिकरण या ठिकाणी दिव्यांग पोलीस मित्र मोशी विभाग या संस्थांच्या वतीने विभाग प्रमुख स्मिता नितीन सस्ते, उप विभाग प्रमुख सागर सुपल, संपर्क प्रमुख नितीन सस्ते आणि आशा माने यांच्या पुढाकाराने गणेश संकलन, निर्माल्य गोळा करणे, नागरिकांना गणेश संकलनसाठी आवाहन करणे, गणेश मूर्तीची आरती करुन निर्माल्य, निर्माल्य कुंडात टाकणे ही सर्व कामे करुन घेतली.


या कामामध्ये मोशी पोलीस मित्र टीम स्मिता सस्ते, सागर सुपल, नितीन सस्ते, संगीता सुपल, शरद डुबुकवाड, हर्षदा गाडे, आशा माने, निर्मला हेगडे, दिक्षा साबळे, चंद्रकला लष्करे, राजेश शिंदे, अशोक भोर, प्रशांत करवंदे, बबन हेगडे, मनोज लष्करे, इत्यादी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड मनपाने मूर्ती दान, निर्माल्य व्यवस्थापन यासाठी विशेष व्यवस्था केली होती. मनपाच्या या पर्यावरण पूरक मोहिमेला आम्ही दरवर्षी स्वयंसेवक म्हणून मदत करत राहणार. आपल्या नद्या ह्या निसर्गाची देणगी आहे त्यांना दूषित होण्यापासून वाचवायला पाहिजे हे आपले परम कर्तव्य आहे या कार्या मुळे नद्या प्रदूषित होणार नाहीत ,असे स्मिता सस्ते यांनी सांगितले.


घरकुल मध्ये गणपतीदान, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

चिखली - घरकुल वसाहत चिखली येथील नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन श्री गणेश मूर्तीचे दान महानगरपालिकेस केले.


कै.तुकाराम तनपुरे फाउंडेशन आणि पोलीस नागरिक मित्र संस्थेचे संस्थापक अशोक तनपुरे, विजयकुमार अब्बड, लक्ष्मण शिंदे, अमृता वैद्य, कुणाल बडीजगेर, चैतन्य चव्हाण या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पर्यावरण विकास कार्यक्रमांतर्गत विशेष मोहीम राबवली. एकूण 400 गणेश मूर्तीचे विधिवत दान मनपाला करण्यात आले.

घरकुल येथील सामाजिक कार्यकर्ते किसन शेवते, अशोक मगर, कांतीलाल हरिनखेडे, राम खापरे, अशोक कोटमाळे, कुणाल पळसकर, ओमलंग घोणे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
संस्कार प्रतिष्ठान, महिला बचत गटाचे गणपतीदान व संकलन मोहिमेस सहकार्य, ६८६८ मुर्ती दान व १६ टन निर्माल्यदान 


संस्कार प्रतिष्ठान पिंपरी चिंंचवड शहर आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने १० गाड्या गणपतीदान व संकलन करण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या. थेरगाव पुल घाट चिंंचवडगाव येथे घाटावर ६ गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती.


संस्कार प्रतिष्ठानच्या ४ गाड्या फिरत्या ठेवल्या होत्या.दहाव्या दिवशी पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी महाविद्यालय सहभागी झाले होते. थेरगाव पुल घाटावर २७४३ भाविकांनी मुर्तींचे दान दिले. तसेच रावेत शिंदेवस्ती, गुरुद्वारा, बिजलीनगर प्रेमलोक पार्क, चिंचवडेनगर बळवंतनगर शिवनगरी गिरीराज, काकडे पार्क, अजमेरा, भोसरी, श्रीधरनगर, दळवीनगर, गिरीराज, गंधीपेठ तसेच काळेवाडी रायगड कॉलनी, प्रभात कॉलनी, मासुळकर कॉलनी, पिंपरी गावातील वैभवनगर या विविध परिसरातील २१८० गणेशभक्तांनी संस्कार प्रतिष्ठानच्या फिरत्या गणपती संकलन गाडीमध्ये तेथील कार्यकर्त्यांनी व महिला बचत गटांनी गणेशमुर्ती जमा करुन दान दिले. 


गाडीसोबत निर्माल्य पण जमा केले. संस्कार प्रतिष्ठानने एकूण ४९२३ गणपतीदान घेतले संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने गणेश विसर्जनाच्या सहाही दिवशी वेगवेगळ्या टिम तयार करुन प्रत्येक टिमला जबाबदारी दिली आहे. ब प्रभाग स्थापत्य विभागातील सर्व अधिकारी, आरोग्य विभागातील सर्व अधिकारी आणि सर्व कर्मचारी तसेच आज दहाव्या दिवसाची जबाबदारी संस्थेचे सर्व आजी माजी पदाधिकारी, सर्व सभासद आणि संस्कार, संस्कृती, सदभावना महिला बचत गट यांनी सहभाग घेऊन उत्तमरित्या पार पाडली.


संपुर्ण दहा दिवसात हॉटेल रिव्हर व्ह्यु घाट चिंचवड येथे ६८६८ मुर्ती दान व १६ टन निर्माल्यदान  फिरत्या वाहनातून ३२०७ मुर्तीदान एकूण मुर्ती दान १००७५ यावर्षी मिळाले.

शेवटी संपुर्ण घाटावर इतःस्त पडलेले निर्माल्य साफसफाई करुन जमा केले. संकलन केंद्राच्या परिसरात स्वच्छता अभियान घेतले. दान घेतलेल्या मुर्तींचे विनोदेवस्तीवरील तळ्यावर गेल्यानंतर विधीवत विसर्जन केले. यामध्ये ब प्रभाग अधिकारी सोनम देशमुख, डॉ.मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता सतीश वाघमारे, विरसन चिरेकर स्थापत्य, कंचन इंदलकर आरोग्य निरीक्षक यांच्या सहभाग घेऊन सहकार्य केले. सामाजिक कार्यकर्ते खंडू चिंचवडे यांनी सर्व कार्यकर्त्यांना चहा व नाष्ठ्याची व्यवस्था केली होती.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा