Breaking


चांदवडमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांचा सत्कार


चांदवड (सुनिल सोनवणे) : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने निदोष मुक्तता केल्याने त्यांचा मुंबई आग्रारोडवरील हॉटेल राजश्री येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. 


जिल्ह्यातील मालेगाव व नांदगाव तालुक्यात अतिवृष्टीने पाऊस झाल्याने छगन भुजबळ हे पाहणी दौऱ्यावर आले असताना चांदवड येथे त्यांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन करण्यात आला. यावेळी प्रसार माध्यमाने सदन घोटाळा प्रकरणी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली त्यावर त्यांनी सांगितले की, जनता माझ्या पाठीशी आहे व जनतेच्या आशीर्वादाने मला कोर्टाने मुक्त केले असे सत्कार समारंभ वेळेस म्हणाले.


यावेळी माजी उपसभापती यु.के.आहेर, चांदवड तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव, शिवाजी कासव, रघुनाथ आहेर, सतिश सोनवणे, सुनील कबाडे, अमोल खैरे, सुनील सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, बाळासाहेब पाटील, महेश माळी, प्रकाश शेळके, डॉ.अरुण निकम, विजय जाधव, तुकाराम सोनवणे, रिजवान घासी, केशव खैरे, अशोक खैरे, अशोक जाधव, आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.


यावेळी चांदवडचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र जाधव, उपनिरीक्षक गजानन राठोड, पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा