Breaking

ब्रेकिंग : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी दिला राजीनामा


अहमदाबाद : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिला आहे. यांच्या या राजीनाम्याने गुजरातच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.


मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राज्यपाल यांची भेट घेऊन आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. त्यानंतर रूपाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे त्यांनी संधी दिल्याबद्दल आभार मानले. रुपाणी यांनी आजारपणाच्या कारणामुळे राजीनामा दिल्याचं सांगितलं जातं. 


रुपाणी यांच्या राजीनाम्यामुळे गुजरातचे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, मात्र या राजीनाम्यानंतर नितीन पटेल यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.


दरम्यान, पुढील वर्षी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर नितीन पटेल यांना मुख्यमंत्री पद देऊन पटेल समाजाची नाराजी दूर करण्याची भाजपची व्यूवहरचना असल्याचे बोलले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा