Breakingपुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता तर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट


पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले गुलाब चक्रिवादळ काल उशिरा रात्री ओरीसा-आंध्र प्रदेश किनारपट्टीवर धडकले. त्याची तीव्रता आता कमी दाबाच्या तीव्र क्षेत्रात झाली आहे. या गुलाब चक्रिवादळाचा प्रभाव म्हणून महाराष्ट्रात पुढचे ३ दिवस मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


राज्यात २८ सप्टेबर रोजी जळगाव, धुळे, नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. औरंगाबाद, जालना, पुणे, अहमदनगर, बीड, परभणी, हिंगोली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे तर  अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. 


हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढचे ३ दिवस मुसळधार ते अती  मुसळधार पावसाची शक्यता आहे, तसेच काही ठिकाणी अती वृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा