Breakingजुन्नर : दिव्यांग विद्यार्थी वसतिगृहाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न !


जुन्नर / शिवाजी लोखंडे : जुन्नर एज्युकेशन सोसायटीच्या दिव्यांग विद्यार्थी वसतिगृहाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन सोहळा आज (दि.27) रोजी संपन्न झाला.


आमदार अतुल बेनके, नगराध्यक्ष शाम पांडे, जुन्नर एज्युकेशन सोसायटी संस्थेचे अध्यक्ष संभाजी बुट्टे पाटील, दिलीप डुंबरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. 


जुन्नर एज्युकेशन सोसायटी हि संस्था गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी नामांकित संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेच्या उभारणीत व वाटचालीत महत्वाचा वाटा असणाऱ्या स्व. रावसाहेब बुट्टे पाटील, स्व.गुरुवर्य रा.प.सबनीस, स्व. बन्सीलाल मुथ्था यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच या दिव्यांग विद्यार्थी वसतिगृहाच्या नवीन इमारतीची पाहणी देखील मान्यवरांनी केली.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा