Breakingजालना : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आंदोलनजालना : आज देशभरात संयुक्त किसान मोर्चाने नेतृत्वाखाली भारत बंदची हाक दिली होती. त्याला प्रतिसाद देत अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.


तीन शेतकरी कायदे रद्द करा, शेतमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के हमीभाव देणारा कायदा करा, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या, आदी मागण्या करण्यात आल्या.

या वेळी आण्णा सावंत, गोविंद आर्दड, सुभाष मोहिते, शरद ढेरे, दिपक शेळके, शरद डुकरे आदीसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा