Breaking

जुन्नर : अक्षय बोऱ्हाडेवर पत्नीने केले गंभीर आरोप ; अक्षयच्या अडचणीत वाढ


जुन्नर / आनंद कांबळे : शिवऋण संस्थेचे प्रमुख अक्षय बोराडे, त्याची आई व भावाच्या विरोधात शारिरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी रुपाली बोराडे यांनी तक्रार केल्याने जुन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


रुपाली व अक्षय बोराडे यांचा प्रेमविवाह झाला असून लग्न झाल्यापासून अक्षय रुपालीस दारु पिऊन मारहाण करत असे. रुपाली हिने या त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशनही केले होते. त्यावेळी ही साधी विचारपूससुद्धा त्याने केली नव्हती. त्याचप्रमाणे  वेळोवेळी रिव्हाँलवर दाखवून रुपाली व तिच्या नातेवाईक यांना त्रास दिला होता. शारिरिक व मानसिक त्रास अक्षय, त्याची आई, भाऊ देत होता अशी फिर्याद रुपाली बोराडे हिने दिली आहे.


या प्रकरणी अक्षय व त्याची आई व भावाविरोधात भादवि कलम ४९८(अ), ४२०, ४०६, ३२४, ३२३, ५९४, ५०६, ३४ व शस्र आधिनियम २५ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली  सहायक पोलिस निरीक्षक शिंदे करत आहेत.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा