Breakingजुन्नर : बिबट्या मृत अवस्थेत विहिरीत आढळला


जुन्नर : उदापूर, ता. जुन्नर येथे एका विहिरीमध्ये बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. मिळाल्या माहितीनुसार चौधरवाडी येथील ज्ञानेश्वर शंकर चौधरी यांच्या विहिरीमध्ये बिबट्या मृत आढळून आला.


स्थानिक व्यक्ती विहिरीमध्ये सहज डोकावू पहात असताना बिबट्या मृत अवस्थेत दिसून आला. त्यांनी याची माहिती वन विभागाचे अधिकारी राठोड यांना दिली.


वन विभागाच्या टीमने बिबट्याला बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी नेले असून त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वन विभागाचे अधिकारी राठोड, बबनराव फुलवडे, यशवंत आमुक, मनोज चौधरी, नितीन शिंदे, विनोद भोर व स्थानिक तरुणांनी मदत केली.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा