Breaking
जुन्नर : खंडणी प्रकरणी अक्षय बोऱ्हाडे यांस अटक


जुन्नर /  आनंद कांबळे : जुन्नर येथील व्यावसायिकास फोन करुन पैसे दे, नाही तर जीवे मारण्याची धमकी देवून खंडणी मागितल्या प्रकरणी अक्षय मोहन बोऱ्हाडेला जुन्नर पोलिसांनी अटक केली.व्यावसायिक रुपेश प्राणलाल शहा यांची जुन्नर येथे गँस एजन्सी आहे. शहा यांच्या विरोधात अक्षय बोऱ्हाडे यांनी तहसिल कार्यालयात पुरवठा विभागात माहिती अधिकारात नागरी वस्तीत गँस गोडावून कसे याबाबत माहिती मागितली होती.


तसेच शहा यांच्या आँफिसमध्ये दोन साथीदारांना पाठवून पैशाची मागणी केली होती. तसेच शहा यांना फोन करुन माझी माणसे पाठवली आहेत. त्यांच्याकडे पैसे दे. 

तसेच वेळोवेळी माझ्या संस्थेमध्ये येणारा खर्च तूला द्यावा लागेल, नाहीतर मी तुझ्या विरोधात फेसबुक लाईव्ह करुन तुझा व्यवसाय कसा चालतो ते बघून घेईल अशी धमकी दिली.


याबाबत फिर्यादी रुपेश शहा यांनी आरोपीस प्रतिसाद न दिल्याने, आरोपीने माहे जून २०२१ मध्ये फोन करुन पैशाची मागणी करुन, तू जर पैसे दिले नाही तर, तुला मी कोण आहे, माझा मागे किती लोक आहेत. ते तूला सांगावे लागेल का, तुझा गेम कधी करेन हे तुला कळणार सुद्धा नाही. अशी धमकी देवून खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली.

याबाबत पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार पाटील अधिक तपास करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा