Breaking


जुन्नर : मंडल अधिकारी रिना मडके यांचे अपघाती निधन !


जुन्नर : पुणे येथे झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणात मंडल अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या रिना सचिन मडके वय 32 वर्षे यांचे दिनांक 9 सप्टेंबर रोजी पुणे येथे अपघाती निधन झाले. 


सेनापती बापट रोडवर हॉटेल मेरियट जवळ ऑफिस सुटल्यावर घरी जाताना मोटार सायकल स्वाराने जोरदार धडक दिल्याने त्या जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी तत्काळ जोशी हॉस्पिटल येथे दाखल केले परंतु त्यांनी उपचाराला साथ दिली नाही. अखेर रात्री 9.30 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर तांबे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.


या अपघातासंदर्भात त्यांचे पती सचिन मडके यांनी चतुर्श्रुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संबंधित मोटरसायकल स्वारला अटक करण्यात आली असून पुढील तपास चतुर्श्रुंगी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उकिर्डे करत आहेत.1 टिप्पणी: