Breaking


जुन्नर : राजूरी येथून दिव्यांग जनजागृती कार्यक्रमास सुरुवात !


जुन्नर : जुन्नर तालुक्यात प्रहार जनशक्ती रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रूप यांच्या वतीने अस्मिता भवन,  राजूरी येथून दिव्यांग जनजागृती कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.


जुन्नर तालुक्यातील दिव्यांग, विधवा, परित्यक्ता, सोडचिठ्ठी झालेले, निराधार, अनाथ लोकांना  त्यांच्या हक्क मिळवून देण्यासाठी व शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळून देण्यासाठी प्रयत्न करणे, याची सुरुवात  डुंबरवाडी,आळेगाव, राजुरी, बेल्हे बांगरवाडी  येथून सुरूवात केली आहे 


शासनाने 21 प्रकारचे नवीन आजारांचा समावेश दिव्यांगांचा समावेश केला आहे. तसेच जिल्हा परिषद, नगरपालिका, समाज कल्याण, व  व्यवसाय सुरू करण्याचा करीता  लघुउदयोग बँक कर्ज, व तयार केलेला माल याची मार्केटिंग, अंत्योदय राशन कार्ड, संजय गांधी पेन्शन योजना दिव्यांग ऑनलाईन प्रमाण पत्र, व मोफत युडीआयडी (युनिक कार्ड) आरोग्य विषयी, दिव्यांग लोकांना व जेष्ठ नागरीक यांना मोफत साहित्य वाटपाची नाव नोंदणी करुन विविध योजनांची माहिती देण्यात आली.


या वेळी प्रहार जनशक्ती रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण व अरूण शेरकर, उपाध्यक्ष राहुल मुसळे, ज्ञानदेव   बांगर, मंगेश भुजबळ, ओमकार शिंदे, नरसिंग कलोसिया, हेमलता शिंदे, बाळासाहेब हाडवले, अनंत हाडवले, संदीप कणसे, भिमाजी मालुसकर, सचिन औटी, प्रतिभा औटी, अश्विनी हाडवले, अनिता हाडवले, ज्ञानेश्वर मालुसकर, अरूण शेटे, विनायक शिंदे, तबाजी आरोटे,  महादु आरोटे, शांताराम डुंबरे, मिनाक्षी औटी, मंदा हाडवले, पुष्पा गायकवाड, बाबाजी औटी, शाहिद पटेल, शिल्पा शिंदे, जालिंदर बांगर, देवराम रोकडे, हिराबाई  बांगर, रमेश शिंदे व दिव्यांग बांधव उपस्थित होते.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा