Breaking


जुन्नर : भिवाडे बुद्रुक येथे रोजगार मेळावा संपन्न !


जुन्नर : गावागावातील लोकांच्या हाताला काम आणि दाम मिळण्यासाठी हा मेळावा घेत आहोत  आणि तालुक्यातील 15 गावात अनेक लोकांना  मनरेगाच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये रोजगार निर्माण केला आहे. आता वृक्ष संगोपन साठी तालुक्यात 80 मजुरांना प्रति दिवसाची 248 रुपये मजुरी मिळते आहे म्हणजे महिना 6,448 रुपये मिळतात त्यामळे लोकांनी अधिक अधिक मागणी करावी, असे आवाहन किसान सभेचे तालुका अध्यक्ष डॉ मंगेश मांडवे यांनी केली.


भिवाडे बुद्रुक येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणी आणि जनजागृतीसाठी जुन्नर तालुका किसान सभेच्या वतीने रोजगार मेळावा संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.


पुढे बोलताना ते म्हणाले, गावातच रोजगार मिळेल. त्यामुळे रोजगारासाठी होणारे तरुणाचे आणि महिलांचे स्थलांतर थांबेल आणि महिलांना सर्वात सुरक्षित आणि हक्काचा रोजगार त्याच्या गावात मिळेल, असे डॉ. मांडवे म्हणाले.

यावेळी कृषी सहाय्यक मडके, शिंदे, भालेकर यांनी  कृषी विभागच्या मनरेगा अंतर्गत येणाऱ्या वैयक्तिक योजनांची माहिती दिली.


या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी म्हणाले, मनरेगा कायद्याच्या अंतर्गत गावागावातील नवीन संसाधनाची निर्मिती होईल आणि लोकांच्या हाताला काम आणि त्या कामाचा योग्य मोबदला मिळेल, हे त्यांनी कायदा समजावून सांगताना सांगितले.

रोजगार हमी योजना ही महिला बचत गट आणि महिलांना आर्थिक बळ देणार आणि पुरुष आणि महिलांना समान मजुरी देणारी ही एकमेव योजना आहे. या मेळाव्याचे सूत्रसंचालन चतुर्थी मेमाणे  यांनी केले आणि शेवटी संगीता मेमाणे सर्वांचे आभार मानले.


मेळाव्यास महिला बचत गट प्रमुखांसह अनुसया गवळी, इंदूबाई विरणक, सीताबाई विरणक, तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा