जुन्नर : चावंड येथे रोजगार मेळावा संपन्न !
जुन्नर : चांवड येथे ऋषिकेश परिवार स्वयंसहायता समूहच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कृषी मंडल अधिकारी दत्तात्रय जाधव यांनी कृषी विभागातील मनरेगा अंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक लाभाच्या योजनांची महिती दिली.
यावेळी बोलताना किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी म्हणाले, मनरेगा योजनेतून गावाचा आणि कुटुंबाचा विकास करता येईल. गावविकासात लोकसहभाग हा महत्वाचा दुवा असल्याचेही जोशी म्हणाले. कृषी सहायक अमोल भालेराव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी पोलीस पाटील स्वरूप शेळकंदे, राजु कोळप, पेसा अध्यक्ष नारायण वायळ, कोंडीभाऊ बांबळे उपस्थित होते. ऋषिकेश परिवार स्वयंसहायता समूह यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शांता उतले, विमल मेमाणे, लता लांडे, सुनीता शिंदे, तुलसा उतळे यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमासाठी महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऋषिकेश परिवार चे संस्थापक सुरेश जोशी यांनी केले, तर मीना शेळकंदे यांनी आभार मानले.
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा