Breakingजुन्नर : कल्याणपेठ तरुण मित्र मंडळ यांच्या वतीने अग्निशमन दलातील कर्मचाऱ्याचा सत्कार


जुन्नर (रफिक शेख) : जुन्नर नगर परिषदेच्या अग्निशमन दलातील कर्मचारी यांचा कल्याणपेठ तरुण मित्र मंडळ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कठीण आपत्तीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता हे कर्मचारी जीवाची बाजी लावून काम करतात. तीन दिवसांपूर्वी जुन्नर शहरात एकाच वेळी दोन ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यावेळी जुन्नर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे कर्मचारी यांनी आपल्या जीवाची बाजी लावत आग विझवली, त्या निमित्ताने त्यांचा सत्कार करत त्यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली.


यावेळी नगर परिषद कर्मचारी आणि मंडळचे अध्यक्ष तेजस बोठे, साहिल गोसावी व मंडळाचे सभासद भगवान चौधरी, विनायक गोसावी, मनेश बुट्टेपाटील, अभिषेक शिंदे, ऋषिकेश रेंगड़े, गणेश कर्मे, गणेश चौधरी, नरेश शहा, आशिष गोसावी, सुरज गायकवाड, आकाश फुले आदि कार्यकर्त उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा