Breaking

जुन्नर : आंबे येथे रोजगार मेळावा संपन्न !


जुन्नर : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणी आणि जनजागृतीसाठी किसान सभा जुन्नर तालुका आणि आंबे पिंपरवाडी ग्रामपंचायत संयुक्त विद्यामाने रोजगार मेळावा संपन्न झाला.


यावेळी किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी म्हणाले, रोजगार हमी योजनेतून गावाचा आणि कुटुंबाचा विकास होतो. मनरेगा अंतर्गत मिळणाऱ्या कामावर काम केले तर दिवसाला 248 मजुरी मिळते म्हणजे महिना 6448 रुपये मिळू शकतात. तर गावागावातील महिला बचत गटाची महिन्याची जी बचत भरतात, ही चांगली करता येईल आणि पाच वर्षानंतर तीच बचत एक भांडवल असेल आणि त्यातूनच बचत गट मोठा व्यवसाय उभा करू शकतो. रोजगार हमी योजना ही महिला बचत गट आणि महिलांना 
आर्थिक बळ देणारी, तसेच पुरुष आणि महिलांना समान मजुरी देणारी ही एकमेव योजना आहे.


तसेच किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे म्हणाले, ग्रामीण भागासाठी मनरेगा हा कायदा एक वरदान आहे. हा कायदा आपल्याला आपल्या गावात काम मागणीचा हक्क देतो. गावातच रोजगार मिळाल्यामुळे रोजगारासाठी होणारे स्थलांतर ही थांबते. त्याबरोबरच गावात पायाभूत सुविधांचा विकास होईल.

सुरुवातीला नारायण वायाळ यांनी रोजगार हमीवर काम केल्याचा अनुभव सांगितला. तसेच कोंडीभाऊ बांबळे यांनी रोजगार हमीवर काम केल्याने मला 100 दिवस भरल्यानंतर गाई गोठा मंजूर झाला. त्याबरोबर कामातून रोजगार मिळाला यामुळे कुटुंबाला आर्थिक बळकटी मिळाली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास चिमटे तर आभार प्रदर्शन आंबे पिंपरीवाडी गावचे सरपंच मुकुंद घोडे यांनी व्यक्त केले.

यावेळी पोलीस पाटील वैशाली शेळकंदे, उपसरपंच अलका काठे, ग्रामपंचायत सदस्या मीरा डगळे, ग्रामपंचायत सदस्य गोविंद रेंगडे
रोजगार सेवक संदीप शेळकंदे, हातविजचे रोजगार सेवक रोहिदास पारधी, सुकाळवेढे गावाच्या बचत गटाच्या प्रमुख लता घोटकर आंबे बचत गट प्रमुख सुनंदा घोडे, तसेच पिंपरवाडी, हातविज, सुकाळवेढे या गावातील आजी माजी सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, तसेच ग्रामस्थ व बचत गटातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा