Breakingजुन्नर : गोमंस संदर्भात पोलिसांची मोठी कारवाई; एक अटकेत, तर दोन फरार !


जुन्नर : जुन्नर शहर पोलिसांनी पोलिसांनी मोठी कारवाई केली असून अंदाजे १ हजार किलो गोमांस जप्त केले.


सविस्तर वृत्त असे की, जुन्नर येथील कसाई मोहल्यात अब्दुल गफ्फार वय ४१ वर्ष, इम्तियाज हुसून कुरेशी, आवेज गुलाम हुसेन कुरेशी तिघे रा. ता.जुन्नर जि. पुणे यांच्या राहत्या घरात अंदाजे २ लाख ८० हजार रुपये किंमतीचे अंदाजे वजन १ हजार किलो गोमांस सापडले.


त्यांच्यावर घरामध्ये बेकायदेशीर रित्या प्रतिबंध असलेल्या गोवंशची कत्तल केल्याप्रकरणी गुन्हा रजि. न.: 353 /2021 महाराष्ट्र प्राणी संरकक्षण (सुधा) अधि.1995चे क ५, (अ), (ब)(क), ९ भा.द.वि. क.२६९, २७०, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


तर आरोपी अब्दुल गफ्फार अब्दूल जब्बार कुरेशी यांना अटक करण्यात आली असून १ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर आरोपी इम्तियाज हुसून कुरेशी, आवेज गुलाम हुसेन कुरेशी फरार आहेत.


पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार लोहकरे करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा