Breakingजुन्नर : ग्रामपंचायत आंबे - पिंपरवाडी येथे पेसा व वन हक्क मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !


जुन्नर : पुणे जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंचायत क्षेत्र विस्तार कायदा व वनहक्क कायदा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली.


त्या एकदिवसीय कार्यशाळेसाठी यशदा पुणे चे वामन बाजारे यांनी पेसा व वनहक्क कायदा या बद्दल त्यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना बाजारे म्हणाले, पेसा कायदा हा आदिवासींना आपले अधिकार मिळून देणारा व विकासाला चालना देणारा आहे. त्यामुळे तरुणांनी पुढे येऊन आपले अधिकार समजून घेणे गरजेचे आहे.


यावेळी आंबे - पिंपरवाडी गावचे सरपंच मुकुंद घोडे, उपसरपंच अलका काठे, हातविज गावचे ग्रामसेवक गवारी, आंबे गावचे ग्रामसेवक भालिंगे, तलाठी अडसरे, पेसा अध्यक्ष हनुमंत काठे, ग्रामपंचायत सदस्य लता किर्वे, ग्राम रोजगार सेवक संदीप शेळकंदे तसेच गावातील आजी - माजी सरपंच व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा