Breaking


जुन्नर : पोलिसांचे धाड सत्र; धनगरवाडी, नारायणगाव, वारुळवाडी, गुंजाळवाडी, साळवाडी येथील चौघांवर गुन्हा दाखल


नारायणगाव / रवींद्र कोल्हे : राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाच्या २४ तासांपूर्वी नारायणगाव पोलिसांनी कार्यक्षेत्रातील नारायणगाव, साळवाडी, धनगरवाडी, वारुळवाडी आणि गुंजाळवाडी या ठिकाणी अचानक छापेमारी करून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या धाड सत्रात ३ लाख ३ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची अधिकृत माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विलास देशपांडे यांनी दिली.


या बाबत अधिक महिती अशी की, रविवार दि.२९ ऑगस्ट रोजी येथील पुणे नाशिक महामार्गावरील "हॉटेल विजयराज" येथे जवळ अवैध दारू विक्री करणारा आरोपी विजय मधुकर विटे यांस नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच दिवशी भोरवाडी ते साळवाडी रोडवर जाणाऱ्या रोडच्या कडेला आरोपी सुरेश बसप्पा डोमाले हा चोरून दारू विक्री करीत असतांना पोलिसांना मिळून आला. 


गुंजाळवाडी शिवारात महिला आरोपी अलका गोविंद वारुळे चोरून दारू विक्री करीत असतांना आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याचप्रमाणे सोमवार दि.३० ऑगस्ट रोजी धनगरवाडी शिवारातील आरोपी नामे निलेश मारवाडी यांचेकडे पाच लिटर तयार गावठी दारू आणि ३००० हजार लिटर रसायन मिळून आले असून एकूण ३ लाख १ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपिकडून हस्तगत करण्यात आला आहे. 

आरोपी मारवाडी याचेवर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा.र.नं. १६५/२०२१ महाराष्ट्र दारू बंदी कायदा कलम ६५( ई ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तर रविवार दि.२९ ऑगस्ट रोजी विजय विटे याचेवर नारायणगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा.र.नं. १६३/२०२१ ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


साळवाडी येथील सुरेश बसप्पा डोमाले याचेवर गु.र.नं. १६१/२०२१ महाराष्ट्र दारू बंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याचप्रमाणे महिला आरोपी वारुळे यांचेवर १६२/२०२१ महाराष्ट्र दारू बंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांचे मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलिस स्टेशन'चे प्रभारी पोलिस अधिकारी विलास देशपांडे, सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पो.स.ई. सुनीत धनवे, पो.ना.साबळे, पो.ना.शेख, पो.कॉ.लोहोटे, पो.कॉ.तांबे, पो.कॉ.सातपुते, पो.कॉ.ठोंबरे, पो.कॉ.जायभावे यांनी ही कारवाई केली.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा