Breaking


जुन्नर : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, घरातील २१ तोळे सोनेही केले लंपास


जुन्नर : अल्पवयीन मुलीला विश्वासात घेऊन लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याप्रकरणी विक्रम देवराम डोंगरे रा. चाळकवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे याने एप्रिल २०२० ते ऑगस्ट २०२१ या कालावधी अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. तसेच आर्थिक कारण सांगत २१ तोळे सोने लंपास केले. 


या प्रकरणी पिडितेच्या आईने तक्रार दिल्यानंतर बलात्कार, पोक्सो, अपहार प्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा