Breakingजुन्नर : दहा दिवसांत जुन्या बसस्थानकाचे काम झाले नाही तर मनसे स्टाईल ने आंदोलन करण्याचा इशारा !


जुन्नर / रफिक शेख : जुन्नर येथील जुन्या बसस्थानकाचे काम दहा दिवसांत झाले नाही तर मनसे स्टाईल ने आंदोलन करु असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नारायणगाव आगार प्रमुखांना एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


सविस्तर वृत्त असे की जुन्नर येथील जुन्या बसस्थानकाची दुरावस्था झालेली असून तेथे खड्डे पडले असूश लाईट, स्वच्छतागृह नाही. तसेच बसण्याची व्यवस्था नसल्याने प्रवाशांना गैरसोयीचे होत आहे. 


याविरोधात मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे यांनी मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा