Breakingजुन्नर : तहसीलदार हनुमंत कोळेकर यांची बदली, 'हे' असतील नवे तहसीलदार !


पुणे : जुन्नरचे तहसीलदार हनुमंत कोळेकर यांची बदली झाली असून आता रवींद्र सबनीस हे नवे तहसीलदार म्हणून पदभार स्विकारतील.  


मंत्रालयातून बदलीचे आदेश आले असून हनुमंत कोळेकर यांची सहाय्यक अन्नधान्य वितरण अधिकारी पुणे या पदावर बदली करण्यात आली आहे.


जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके व तहसीलदार कोळेकर यांचे बिनसले होते. त्यांची बदली करण्याची मागणी देखील आमदार बेनके यांनी केली होती. 

अखेर हनुमंत कोळेकर यांंची बदली करण्यात आली असून एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून कोळेकर यांची ओळख आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा