Breaking


जुन्नर : "आपलं गांव, आपली जबाबदारी; आपली माणसं, आपली खबरदारी" हे ब्रीदवाक्य स्मरणात ठेवून लसीकरण


नारायणगाव  / रवींद्र कोल्हे : कोरोना प्रादुर्भाव आणि संसर्ग यावर मात करण्यासाठी सध्यातरी लसीकरण हाच उपाय आहे. असे मत जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने मान्य केले आहे. त्यां नुसार राज्य सरकारने विक्रमी लसीकरण करून कोरोना संसर्गावर मात करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाला नारायणगाव चे सरपंच योगेश पाटे यांनी "आपलं गांव - आपली जबाबदारी; आपली माणसं - आपली खबरदारी, हे ब्रीदवाक्य स्मरणात ठेवून लसीकरण कार्यक्रम आयोजित केला आहे.


नारायणगाव करांच्या आरोग्याच्या दृष्टीने पहिल्या टप्प्यातील १८७० नारायणगाव करांचे लसीकरण ३१ ऑगस्ट रोजी करण्यात आले. आज नारायणगाव ग्रामपंचायत आणि वारुळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ९०० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी क्रिमिनल लॉयर अँड.राजेंद्र कोल्हे, सरपंच योगेश पाटे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी वर्षाताई गुंजाळ, वॉर्ड क्र. चार चे सदस्य राजेश बाप्ते यांचे हस्ते उद्घाटन पार पडले.


आज मंगळावर दि.७ सप्टेंबर रोजी नारायणगाव येथील मुक्ताई मंदिरात लसीकरण कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात ९०० नागरिकांनी लाभ घेतला आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते किरण ताजणे, जालिंदर खैरे त्याचप्रमाणे वारुळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि ग्रामपंचायत नारायणगाव कर्मचारी यांनी यशस्वी परिश्रम घेतले.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा