Breakingजुन्नर : माणकेश्वर येथे वन धन योजनेची कार्यशाळा संपन्न


जुन्नर / शिवाजी लोखंडे : शनिवार दि.२५ सप्टेंबर २०२१ रोजी माणकेश्वर येथे पर्यावरण व जनजातीय कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या अंतर्गत प्रधानमंत्री वन धन योजनातील कुकडेश्वर वन धन विकास केंद्र, पूर यांच्या शेतकरी बचत गटाची एकदिवसीय कार्यशाळा माणकेश्वर येथे संपन्न झाली.


या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विश्वनाथ निगळे उपस्थित होते. त्याचप्रमाणे कुकडेश्वर सहकारी औद्योगिक संस्थेचे चेअरमन काळू शेळकंदे, राजू शेळके, कमा साबळे, शंकर घोडे, धर्मा कोरडे यांनी वनउपजानवर मार्गदर्शन केले.


या कार्यशाळेसाठी कोंडीभाऊ बांबळे, बाळू कोरडे, किसन शेळकंदे, अमोल बांबळे, पांडुरंग बांबळे, सुरेश कोरडे, निलेश लांडे हे सभासद उपस्थित होते.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा