Breakingजुन्नरमध्ये मजुरांच्या कायदेशीर हक्कांना हरताळ, प्रशासनाला जाब विचारण्यासाठी किसान सभेचा एल्गार !


जुन्नर : जुन्नरमध्ये मजुरांच्या कायदेशीर हक्कांना हरताळ फासला जात असल्याचा आरोप करत प्रशासनाला जाब विचारण्यासाठी जुन्नर तालुका किसान सभेच्या वतीने तहसीलदार कचेरीवर २७ सप्टेंबर रोजी एल्गार मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी यांनी दिली.


१७ सप्टेंबर रोजी जुन्नर तालुका किसान सभेची कार्यशाळा जुन्नर येथे पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आल्याचेही सांगण्यात आले.


जोशी म्हणाले, ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यांत बेरोजगार मजुरांच्या हाताला काम मिळावे. आणि कामासाठी स्थलांतर करावे लागु नये म्हणून तालुका किसान सभेने गावोगावी रोजगार हमी योजना जनजागृती मेळावे घेतले. यामुळे शेकडो मजुरांनी काम मागणीचे अर्ज भरून ग्रामपंचायतकडे कामाची मागणी केली. परंतु ग्रामपंचायतींमध्ये हे काम मागणीचे अर्ज स्विकारले नाहीत. ज्या ग्रामपंचायतींमध्ये अर्ज स्विकारले तेथे अर्जाची दिनांकित पोच दिली नाही. जेथे पोच मिळाली तेथे कामे चालु केली नाहीत. तालुक्यात रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी फक्त वैयक्तिक कामांसाठीच केली जाते. सार्वजनिक कामांना मात्र हरताळ फासण्याचे काम प्रशासनाकडून केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या कार्यशाळेसाठी किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे, तालुका सचिव लक्ष्मण जोशी यांनी मजुरांना मार्गदर्शन केले. यांनी संजय साबळे आभार मानले.


या कार्यशाळेसाठी किसान सभेचे तालुका उपाध्यक्ष नारायण वायाळ, सदस्य कोंडीभाऊ बांबळे, आंबे पिंपरवाडी सरपंच मुकुंद घोडे, नवनाथ मोरे, आंबे गावचे रोजगार सेवक संदीप शेळकंदे, सचिन मोरे, इंगळुन बचत गट प्रमुख पुष्पा डामसे, देवळे बचत गट प्रमुख रानुबाई बोऱ्हाडे, त्याबरोबर इंगळुन, देवळे, खैरे, खटकाळे, निमगिरी, भिवाडे गावातील मजूर, महिला हजर होत्या.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा