Breakingकोल्हापूर : शिरोली (पु) येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन


हातकणंगले : शिरोली (पु) ता. हातकणंगले येथील ग्रामपंचायत कामगारांना किमान वेतनाप्रमाणे पगार मिळावा, कामगारांच्या पगारातून कपात केलेली भविष्य निर्वाह निधी ची रक्कम कामगारांच्या खात्यात जमा करावी व अन्य मागण्यासाठी श्रमिक जनरल कामगार संघटना इचलकरंजी यांच्या वतीने कॉ. आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज धरणे आंदोलन करण्यात आले.


यावेळी शिरोली चे लोकनियुक्त सरपंच शशिकांत खवरे, ग्रामसेवक भोगण, उपसरपंच सुरेश यादव, ग्रामपंचायत सदस्य सरदार मुल्ला यांनी निवेदन स्विकारून लवकरात लवकर मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले.


यावेळी औदुंबर साठे, सुकुमार कांबळे, दिनेश ललिबेग, संतोष कांबळे, संग्राम यादव उत्तम गेजगे, नागेश कांबळे, शबीर सनदी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामपंचायत कामगार हजर होते.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा