Breaking


कोपरे - मांडवे येथील विविध प्रश्नांना घेऊन आदिवासी युवक परिवर्तन प्रतिष्ठानचे लोकप्रतिनिधींना निवेदन


जुन्नर : आदिवासी युवक परिवर्तन प्रतिष्ठान वतीने कोपरे - मांडवे येथील विविध प्रश्नांना घेऊन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, शिवसेना नेते खासदार संजय राऊत सह अकोले चे आमदार डॉ.किरण लहामटे यांना निवेदन आले.जुन्नर तालुक्यातील उत्तर पुणे जिल्हा मधील दुर्गम डोंगराळ भागात वसलेली कोपरे, मांडवे, मुथाळणे, फोफसंडी या गावातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मांडवी नदीवर एम. आय. टँक उभारण्याची या भागातील आदिवासी जनतेची पिढ्यान्पिढ्या मागणी आहे.

या भागात बंधारे बांधले जाणार आहेत, परंतु याला जनतेतून विरोध होत असल्याचे दिसत आहे. ग्रामस्थ म्हणत आहेत की, या भागात या पूर्वीच असे बंधारे बांधण्यात आले आहे. पण त्यात पाणी राहत नाही हा अनुभव पाठीशी आहे.


नागरिकांचे म्हणणे आहे की, धरण झाले तर या भागतील शेती, रोजगार प्रश्न सुटणार आहे. या भागातील नागरिकांना मोलमजुरीसाठी बनकर फाटा येथे जावे लागते. वेळोवेळी शासन दरबारी हा प्रश्न मांडून देखील निकाली काढण्यात आला नाही. त्यामुळे जनभावना तीव्र होताना दिसत आहे.

आदिवासी युवक परिवर्तन प्रतिष्ठानचे राजू ठोंगीरे म्हणाले, "आता या भागातील आदिवासी जनतेने आपल्या मुले बाळे घेवून रस्त्यावर उतरल्या शिवाय पर्याय राहिलेला नाही." असे परिवर्तन प्रतिष्ठान सामाजिक संघटना कार्यकर्ते राजेंद्र ठोगीरे यांनी सांगितले. 


जुन्नर येथे राजेंद्र ठोंगीरे यांच्या नेतृत्त्वाखाली परिवर्तन प्रतिष्ठान कार्यकर्ते पांडुरंग मुठे, उमेश माळी, संजय कुडळ, राहुल कवटे, यांनी नरहरी झिरवळ यांना निवेदन देऊन माहिती दिली. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे उपस्थित होते.

तसेच आळेफाटा येथे शिवसेना मेळावा मध्ये शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना भीमा माळी यांच्या नेतृत्त्वाखाली अंकुश माळी, अमोल काठे, नामदेव माळी, नवनाथ माळी, शिवाजी माळी, सागर माळी, जयराम माळी, सुनील माळी, विठ्ठल माळी यांनी भेटून निवेदन दिले.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा