Breakingक्रांतीसिंह नाना पाटील यांची कन्या क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांचे निधन !


विटा : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या आणि माजी आमदार भगवान बाप्पा पाटील यांच्या पत्नी क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले. 


गेल्या काही दिवसांपासून क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील आजारी होत्या. आज (दि.२३) कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतानाच निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.


श्रीमती हौसाताई पाटील यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या बरोबरीने भूमिगत कारवायांमध्ये मुख्य भूमिका बजावली. त्या इंग्रजांच्या माहिती गोळा करून त्या भूमिगत क्रांतिकारकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करीत होत्या.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा